दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; शिरूर पोलिसांची १२ तासांत परजिल्ह्यातून आरोपीला अटक
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा शिरूर (ता. पुणे) — दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्यात फेकून पळून गेलेल्या आरोपीस शिरूर पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत परजिल्ह्यातून बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रितमप्रकाश नगर, पांजरपोळ परिसरात दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात…