थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटात मतदार खेचण्याची चुरस; यात्रांपासून आरोग्यसेवेपर्यंत उमेदवारांची स्पर्धा तीव्र
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा. थेऊर (ता. हवेली) : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका जवळ येताच थेऊर–आव्हाळवाडी गटात उमेदवारांनी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. भव्य यात्रांचे आयोजन, क्रीडा स्पर्धा, आरोग्यसेवा, व्यक्तिगत संपर्क, आणि लाखो रुपयांची उधळण—या सर्वांमुळे गटात चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने वेगळेपण जपत आहे….