कोलवडी, मांजरी खुर्द व आव्हाळवाडी परिसरात बिबट्यांचा वाढता वावर; नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाला तत्काळ पिंजरे लावण्याची मागणी —आरोग्यदुत यूवराज काकडे यांची मागणी. अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाहीचे दिले आदेश
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा 📌 हवेली तालुका / प्रतिनिधी हवेली तालुक्यातील मौजे कोलवडी, मांजरी खुर्द आणि आव्हाळवाडी या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांपासून महिलावर्ग, विद्यार्थ्यांपासून जनावरांपर्यंत सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत थेऊरचे सदस्य तथा समिती अध्यक्ष श्री. युवराज हिरामण काकडे यांनी…