मांजरी–आव्हाळवाडी–वाघोली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवराज काकडे यांची PMRDA कडे मागणी
हवेली | प्रतिनिधी | राष्ट्रहित टाईम्स हवेली तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मांजरीखुर्द–आव्हाळवाडी–वाघोली (MDR 56) हा प्रमुख जिल्हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले असून, वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या परिस्थितीमुळे वाहनचालक, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे…