मुसळधार पावसातही प्रचाराचा धडाका; कुंजीरवाडी परिसरात सौ. कोमल संदेश आव्हाळे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रहित टाईम्स वृतत्तसेवा हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी परिसरात सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराला भर पावसानेही खीळ बसलेली दिसत नाही. मुसळधार पाऊस, चिखललेले रस्ते आणि प्रवासातील अडचणी असूनही उमेदवार सौ. कोमल संदेश आव्हाळे यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असून प्रचार यंत्रणा अधिक जोमाने काम करताना दिसत आहे. या प्रचारात संदेश आव्हाळे स्वतः मतदारांच्या घरोघरी जाऊन थेट संपर्क साधत…