सचिनतात्या तुपेंची राष्ट्रवादीला जाहीर साथ; घड्याळाला मतदान करणार — विरोधी चर्चांना पूर्णविराम!
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा कुंजीरवाडी | प्रतिनिधी कुंजीरवाडी गावचे माजी सरपंच माननीय सचिन तात्या तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आणि घड्याळ चिन्हाला मतदान करणार अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटात सचिन तात्या तुपे हे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतील अशी चर्चा जोर…