पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ( म्हाडा) चा प्रोजेक्ट मॅनेजर (कंत्राटी खासगी इसम)अभिजित जिचकार याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने साधू वासवानी चौक ,परमार चेंबर ,हॉटेल स्टेटस फॅमिली रेस्टॉरंट आणि बार पुणे येथे पंचासमक्ष म्हाडा पुणे यांच्याकरिता २,२०००० /- रुपये व स्वतसाठी ५००००/- रुपये रक्कम घेताना पकडले गेले आहेत. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
म्हाडा कडून नागरिकांना लॉटरी प्रमाणे घरे मिळतात.त्याच पद्धतीने तक्रारदार यांना घर मिळाले होते.त्या घराच्या जाहिरातीच्या वेळेस त्या घराला अधिकची जास्त रक्कम भरावी लागेल असे कोठही लिखित अथवा तोंडी माहिती दिली नव्हती.त्यामुळे तक्रारदार यांना वाढीव हफ्ता भरता आला नाही.त्यासाठी तक्रारदार यांनी सदर घराचे फेरवितरण होऊन आरटीजीस चलन मिळवण्यासाठी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळ पुणे (म्हाडा) यांच्याकडे सविस्तर अर्ज केला होता. व तक्रारदार हे त्याबाबत वारंवार पाठपुरावा करत होते. तक्रारदार म्हाडा कार्यालयातील मुख्याधिकारी व कंत्राटी खासगी इसम अभिजित जिचकार यांना भेटले असता ,त्यांनी घराचे फेरवितरण होऊन आरटीजीस चलन देण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे तक्रारदार यांनी केली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष विभागाने केली असता,आरोपी अभिजित जिचकार यांनी तक्रारदराकडे त्यांचे घर पुन्हा वितरित करून आरटीजीस चलन काढून देण्याकरिता लोकसेवक मुख्याधिकारी ,यांच्याकरिता २,२००००/ – रुपये व स्वतः करिता ५००००/- रुपये ची अशी वाढीव रक्कम पंचासमक्ष लाचेची मागणी केली. ती रक्कम अभिजित जिचकार यांनी पंचासमक्ष दि ३१ मे २०२४ रोजी हॉटेल स्टेटस मध्ये स्वीकारल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भ्रष्टचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलिस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत.