उरुळी कांचन :अखिल भारतीय सांस्कृतिक संघ व ए बी एस एस ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट कल्चर आयोजित बहुभाषिक राज्यस्तरीय नाटक नृत्य संगीत अशा अनेक विषयावर पंडित जवाहरलाल नेहरू संस्कृती भवन शिवाजीनगर पुणे येथे स्पर्धा आयोजित केल्या होत्या .या स्पर्धेमध्ये अवघ्या दहा वर्षाच्या श्रेयस रोशन सोनटक्के याने तबला वादनात प्रथम क्रमांक मिळवला. त्याला हार्मोनियमची साथ संगत साने संगीत कलामंच उरुळी कांचन शिवराज साने यांनी दिली. श्रेयस याला पुढील स्पर्धेसाठी अबुधाबी दुबई या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी त्याचे तबल्याचे मार्गदर्शन गुरु राजेंद्र नंदकुमार एनप्रेड्डीवार हे उपस्थित होते.
