*बुर्केगाव येथील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन मेळावा काल (9 जुन) रोजी संपन्न झाला, १० वी,१२ वी उत्तीर्ण ६५ विद्यार्थींचा सन्मान चिन्ह देउन सन्मान करण्यात आला , नितीन आप्पा बाजारे युवा मंच च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बुर्केगावातील उच्च शिक्षित तरुण श्री विश्वास बाजारे,श्री जिवन गायकवाड,श्री भाऊसाहेब ठोंबरे, प्रिती दाभाडे, संदीप पवळे, किरण बाजारे,साईनाथ दाभाडे,अनुजा बाजारे,प्रसाद दाभाडे, योगेश थोरात,नवनाथ दाभाडे या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी विद्यार्थी, पालक व मान्यवर गा्मस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते*
*कार्यक्रमाचे नियोजन श्री सुरेश भाऊ ठोंबरे, श्री सोमनाथ आबा गुंड, श्री समीर आप्पा बाजारे यांनी केले , कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ रुपाली थोरात होत्या , श्री भिकाजी काळे यांनी सुत्रसंचालन केले व श्री सिताराम दादा सोनवणे यांनी आभार मानले*