उरुळी कांचन:शिरूर हवेली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पूर्व हवेली गाव भेट दौरा पार पडला. या निमित्त त्यांचा विवीध संघटनांचे वतीने व पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पूर्व हवेली मातंग समाज कृती समितीच्या वतीने मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठीचे निवेदन त्यांना देण्यात आले .
पूर्व हवेली मातंग समाज कृती समितीच्या वतीने केलेल्या मागण्या
१) अनुसूचित जातीचे वर्गीकरण करून अ ब क ड अशी वर्गवारी करावी.
२) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
३) लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
४) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाची कर्जमाफी करण्यात यावी.
५) मातंग समाजावर सतत होणारे अन्याय अत्याचार यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय दक्षता समिती स्थापन करून त्यामध्ये मातंग समाजाच्या लोकांना प्राधान्य देण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन कृती समितीचे पदाधिकारी दिगंबर जोगदंड व सहकारी यांनी दिले.मातंग समाजाच्या मागण्या बाबत पाठपुरावा करू.असे आश्वासन खासदार अमोल कोल्हे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.