लोणी काळभोर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित लोणी काळभोर (ता .हवेली) इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नविन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव विद्यार्थांचे औक्षण करून गुलाबपुष्प व चोकलेट देऊन मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले तसेच पालकांचाही सत्कार करण्यात आला अशी माहिती शाळेचा मुख्याध्यपिका सौ .शेवाळे पी. डी यांनी दिली.
राज्यात सन २०२४ ते २०२५ या वर्षाला आज शनिवार (ता .१५) सुरुवात झाली . त्याचं अनुशंगाने लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी लोणी काळभोर च्या सरपंच सविता लांडगे उपसरपंच प्रियंका काळभोर उपस्थित होत्या.
यावेळी नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेवाळे पी. डी यांनी शाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी आनंदाने सहभाग घेऊन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी शिंदे आणि प्रीती हिवाळे यांनी आभार मानले.