मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज भरून देण्याचे केंद्र हे कदमवाकवस्ती गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष मा.अभिजित बडदे यांच्या माध्यमातून व नवपरिवर्तन फाउंडेशनचे मा. चित्तरंजन (नाना) गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली. भगवा प्रतिष्ठाण, जय हिंद ग्रुप, लहुजी शक्ती सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण ही योजना जाहीर करताच याला मोठा प्रतिसाद मिळाला व तहसील सेतू केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या आहे. सरकारने या योजनेची नोंदणी मोफत केलेली आहे, तरीही अनेक ठिकाणी लूट सुरू आहे . या कारणामुळे या योजनेचे मोफत अर्ज भरण्याचे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या भागातील महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा म्हणून हे केंद्र ३१ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. कदमवाकवस्ती पालखी तळ येते सुरू असणाऱ्या या योजनेचा सर्व माता-भगिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे मत गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मा.अभिजीत बडदे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण केंद्राचे उदघाटन हे नवपरिवर्तन फाउंडेशनचे चित्तरंजन गायकवाड, कदमवाक वस्ती गावच्या माजी लोक
नियुक्त सरपंच गौरी गायकवाड, विद्यमान उपसरपंच नासिर पठाण, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट यांच्या हस्ते झाले. यावेळी कदमवाकवस्ती गावचे सदस्य कोमल काळभोर,सिमिता लोंढे, दिपक आढाळे, उदय काळभोर, ज्ञानेश्वर नांदगुडे, सतीश काळभोर, शब्बीर पठाण, दिपक काळभोर,सुहास काळभोर, राहुल झेंडे राकेश लोंढे, विजय बोडके, अभिजीत पाचकुडवे, अण्णा जाधव, दत्ता धायगुडे उपस्थित होते.