अयोध्येनंतर आता बद्रीनाथमध्येही भाजपला धक्का; पोटनिवडणुकीत पराभव, काँग्रेसची सरशी

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क

लोकसभेनंतर आता 7 राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे. या 7 राज्यातील 13 जागांपैकी भाजपला फक्त 2 जागा मिळवता आल्या आहेत. तसेच अधयोध्येप्रमाणेच बद्रीनाथमध्येही जनतेने भाजपला नाकरल्याचे दिसून आले आहे. अयोध्येनंतर आता भाजपला बद्रीनाथमध्येही धक्का बसला आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दमदार विजय मिळवला आहे. तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 

मंगळूरमध्ये चुरशीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तसेच बद्रीनाथमध्येही काँग्रेस पक्षाने वर्चस्व सिद्ध करत भाजपला धोबीपछाड दिली. उत्तराखंडच्या दोन विधानसभेच्या जागांसाठी 10 जुलै रोजी पोटनिवडणूक झाली होती. त्याचे निकाल शनिवारी जाहीर झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत अयोध्येनंतर आता बद्रीनाथमध्येही भाजपला दारुण पराभवाला सामोर जावे लागले आहे. अयोध्येप्रमाणेच बद्रीनाथमध्येही जनतेने भाजपला नाकारले आहे.

 

 

बद्रीनाथ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे लखपत बुटोला 5224 मतांनी विजयी झाले. बुटोला हे काँग्रेसचे नवे उमेदवार होते. बद्रीनाथचे माजी आमदार भंडारी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. लखपत बुटोला यांना 28161 तर भाजपचे राजेंद्र भंडारी यांना 22937 मते मिळाली. मंगळूर विधानसभेतील काँग्रेसचे उमेदवार काझी निजामुद्दीन हे भाजपच्या करतार सिंह भडाना विरुद्ध 449 मतांनी विजयी झाले. उत्तराखंड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी निवडणूक प्रचाराची जबाबदारी घेतली होती. तसेच लोकसभेच्या पाचही खासदारांनीही प्रचार केला. तरीही भाजपला येथे पराभव झाला आहे. उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिंकल्याने काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags