आण्णा भाऊ साठे क्रांती फोर्स पुणे जिल्ह्याच्या वतीने साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा व विविध मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न.

Facebook
Twitter
WhatsApp
  • ज्यांचा साहित्याचा डंका सातासमुद्रापार वाजला या देशात फक्त जात बघून उपेक्षित ठेवलेल्या आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन केंद्र सरकारने सन्मान करावा यासाठी आज आंदोलन करण्यात आले.या सोबतच आरक्षण वर्गीकरण,मुंबई येथील चिरागनगर, वाटेगाव येथील स्मारक, आण्णा भाऊ साठे महामंडळ अशा अनेक मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित आण्णा भाऊ साठे क्रांती फोर्स चे केंद्रीय टीम चे मा. राजाभाऊ अडागळे (प. महाराष्ट्र अध्यक्ष ABS), सचिन काका शेलार(जिल्हाध्यक्ष पुणे ABS), सागर भाऊ साठे (युवक जिल्हाध्यक्ष ABS), विजय सकट (जिल्हा उपाध्यक्ष युवक), मनोज दादा गायकवाड(पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ABS) , संदीप बरांडे (पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष युवा), बाकी सर्वच पदाधिकारी विविध संघटनेतील पदाधिकारी यांनी या आंदोलनाला बळ दिले उपस्थित राहिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags