राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
गुरुवार, दि. १ ऑगस्ट, २०२४ रोजी शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्यावतीने १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी साईशा विनोद शिरवाळे या विद्यार्थीने आण्णाभाऊंच्या जीवनपटावर भाषण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.*
*कार्यक्रमासाठी सरपंच सारीका महाडीक, ग्रामपंचायत सदस्य कमल शिंदे, भाग्यश्री शिंदे, शिवसेना नेते शामराव माने, सामाजिक कार्यकर्ते शेखर शिरवाळे, विनोद शिरवाळे, सचिन शिरवाळे, शंकर शिंदे, रोहित शिंदे, हर्षल शिंदे, अशोक कांबळे, प्रविण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.*
*याप्रसंगी दैनिक लोकमतचे पत्रकार सहदेव खंडागळे बोलताना म्हणाले की, “साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे. आण्णाभाऊंचे चरित्र आणि विचार आपल्या मुलांना पालकांनी सांगितले पाहीजे. शिंदवणे गावात आल्यावर मला आज येथे बहुजन समाजात बंधूभाव पाहायला मिळाला.” सामाजिक सलोखा वृद्धींगत करण्याचा खंडागळे यांनी उपदेश केला.*
*शिंदवणे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश महाडीक बोलताना म्हणाले की, ‘कालकथित आबा शिरवाळे हा एक माझ्या गावातील चांगला कार्यकर्ता होता. मातंग समाजासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. शिंदवणे गावात आण्णाभाऊंची जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. शिंदवणे गावात येणा-या काळात आण्णाभाऊ साठे सभामंडप निर्मितीचे काम करणार आहोत. जयंतीनिमित्ताने समाजाचे व गावाचे नाव मोठे करा.” असा संदेश महाडीक यांनी दिला.*
*समाज परिवर्तन ब्रिगेडचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रा. सदाशिव कांबळे बोलताना म्हणाले की, “आण्णाभाऊ साठे यांचा भारत सरकारने भारतरत्न देऊन गौरव करावा. मातंग समाजाने आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहीजे. मुलांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन पालकांनी मुलांवर संस्कार घडवायले हवेत. मातंग समाजाच्या विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र अर्थात आर्टीची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली आहे. तरी मातंग बांधवांनी लाभ घेऊन आपली मुले अधिकारी करा आणि आपल्या गावाचे नाव मोठे करा.” असे कांबळे यांनी सांगितले.*