राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम लहुजी शक्ती सेना शाखा लोणी काळभोर यांच्यावतीने माळीमळा महात्मा फुले नगर या ठिकाणी सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ व रविवार दिनांक १९ऑगस्ट २०२४ असा दोन दिवस साजरी करण्यात आला . रविवार दिनांक १८ऑगस्ट रोजी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून विश्वराज हॉस्पिटल यांच्या मार्फत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन लोणी काळभोर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर व व उद्योजक कानिफनाथ जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी विश्वराज हॉस्पिटल यांच्या सर्व रुग्णांची बिल या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. याच दिवशी या ठिकाणी दुपार क्षेत्रामध्ये महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य अशी रथयात्रेद्वारे मिरवणूक काढून जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. यावेळी कळम धाराशिव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार कैलास दादा घाडगे पाटील पाथर्डी गावचे माजी सरपंच आश्रुबा राजाराम धेले एस पी जे प्रोसेस चे शरद सावंत जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित देशमुख सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जगताप लहुजी शक्ती सेना चे अध्यक्ष दीपक लोखंडे कार्याध्यक्ष स्वप्निल शिंदे उपाध्यक्ष उद्धव काळुंखे सचिव दत्ता कवळे खजिनदार निशांत कांबळे खजिनदार विशाल सहाने उपकार्य अध्यक्ष महेश कांबळे सोशल मीडिया प्रमुख श्रेयश ढेले मंगेश कांबळे ओमकार कांबळे कैलास ढेले हे उपस्थित होते
दुसऱ्या दिवशी दिनांक १९ ऑगस्ट २०२४रोजी सकाळी दहा वाजता महापुरुषांच्या प्रतिमांची पूजन करून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सदरातील दुसऱ्या दिवशीला प्रारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये संघटनेचे संघटक राहुल अश्रुबा धेले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी संघटक शंकर वाघमारे उमेश मचाले सहसचिव समाधान गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
सायंकाळी दुपार सत्रामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद साळवे व सर्व महापुरुषांवरच्या विचारांवर आधारित महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक चंदन कांबळे यांच्या गीत गायनांचा सांस्कृतिक पर कार्यक्रम अगदी रात्री दोन वाजेपर्यंत मनसोक्त साजरी करण्यात आला. यावेळी शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता या कार्यक्रमाला लहुजी शक्ती सेना या देशव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना मातंग समाजाला मिळालेल्या विविध मागण्यांचा लहुजी शक्ती सेनेच्या पाठपुराव्याने लाभ भेटला याबद्दल आपले विचार व्यक्त केले यावेळी बोलताना ते असे म्हणाले की अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला काही आपल्या जातीतील भावंडांचा विरोध होत आहे हे मातंग समाजाच्या दृष्टीने अनेक कारक असून मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या वर्गीकरणातील आपली वेगळी भाकर मिळणं हे अत्यंत गरजेचे आहे यामुळेच येणाऱ्या २१ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदाचा विरोध करून मातंग समाजाने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाच्या निकालाच्या निर्णयाचे स्वागत करून २१ ऑगस्ट रोजी याचा आनंद उत्सव जल्लोष साजरी करावा त्याचबरोबर चंदन कांबळे यांनी तमाम जमलेल्या शेकडो लोकांच्या जनसमुदायाचा आपल्या गीत गायनाने आनंद द्विगुणीत केला व अगदी दोन वाजल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होत असताना उपस्थित मान्यवरांमध्ये लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट सरचिटणीस आकाश मात्रे राज्य सोशल मीडिया प्रमुख नितीन दोडके अनिकेत हजारे नितीन भाऊ वायदंडे भाऊ कसबे लोणी काळभोर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संजय भालेराव उद्योजक पृथ्वीराज पवार सामाजिक कार्यकर्ते सयाजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सरचिटणीस श्रीकांत शेलार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जगताप यांनी उपस्थिती दर्शविली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लहुजी शक्ती सेना यांच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीराव अडसूळ भैरवनाथ जाधव प्रीतम गालफाडे महेश चांदणे महेश साठे सौदागर आलाट शुभम मोरे सुमित हजारे अर्जुन थोरात भाऊसाहेब उगले प्रमोद अंकुश बबन शिंदे ऋषिकेश वैरागे अजय मोरे यासह सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशा पद्धतीने जयंती दोन दिवसांमध्ये अतिशय आनंद उत्सवामध्ये साजरी करण्यात आली….