राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे प्रतिनिधी:
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष आपलं पारडं जड करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागलं होत. मात्र या निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी विजय मिळवून सुनेत्राताई पवारांचा पराभव केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे बहीण भाव एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
सुप्रिया सुळेंनी घेतला अजित पवारांचा समाचार :
अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो असं वक्तव्य केलं होत. आता त्यांच्या या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळेंनी नाव न घेता समाचार घेतला आहे. कष्ट तर सर्वचजण करत असतात, त्यामुळे कोणी कोणावर उपकार करत नाही.तसेच काही लोकांचा एक डायलॉग आहे. मी सकाळी लवकर उठतो आणि कामाला सुरवात करतो. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दूधवाला पण सकाळी लवकरच उठतो? तसेच त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. कारण की तिला चहा करावा लागतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावला आहे.
एक कोटीमध्ये शून्य किती असतात? सुप्रिया सुळे :
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांनी मतदारसंघांमध्ये तब्बल
5 हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगत आहेत. मात्र हा आकडा म्हणजे काही विनोद नाही. मात्र मला एका कोटीमध्ये नेमके शून्य किती असतात ते देखील माहीत नाही.
सत्ता ही येत असते जात असते. मात्र, तुम्ही लोकांचा विचार कधी करणार आहेत? तसेच कोणी कोणावर उपकार देखील करत नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीने काम हे करत असतो असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत