राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
लहुजी-फुले-शाहु-आंबेडकर-साठे विचार मंच संयुक्त विकास लक्ष्मण सातारकर गौरव समितीने यंदाचा समाज भुषण पुरस्कार हा लहुजी परिवर्तन आघाडी (पक्ष) व जनरल व माथाडी कामगार संघर्ष सेना चे नेते मा विकास लक्ष्मण सातारकर* यांच्या वाढदिवसाच्या पन्नासावे वर्ष म्हणजे वयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षा च्या निमित्ताने त्यांच्या 30 वर्षांच्या समाजीक कार्याचा आढावा घेऊन त्यांचे मातंग समाजावरील अन्याय अत्याचारा विरोधात उभे केलेले आंदोलनात्मक लढे , लहुजी वस्ताद साळवे स्मारक संगमवाडी लढा , दलित आदिवासी महिला कामगार चळवळीतील योगदान आदी कार्याचा आढावा घेऊन प्रदान करण्यात आला हा पुरस्कार *माजी PMT चेअरमन भीमराव पाटोळे* साहेब यांच्या हस्ते देण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष *दलित महासंघ चे राष्ट्रीय नेते प्रा्.डॉ.मच्छिंद्र सकटे सर हे होते या कार्यक्रमाचे आयोजक अविनाश अडागळे हे होतेे. या वेळी उद्योजक दिनकर दांगट, जेष्ठ साहित्यिक संपत जाधव, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते वसंतदादा साळवे,आंबेडकरी नेते राहुल डंबाळे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, राजाभाऊ धडे, प्रकाश वैराळ,रवि आरडे, लक्ष्मण तांदळे, उद्योजक महेश निसाळ, दत्ताभाऊ जाधव, संजय केंदळे,शामभाऊ चंदनशिवे,संतोष माने, बाळासाहेब मोहिते, बिभीषन देवकुळे, संतोष घोलप, संतोष कांबळे,अमोल खंडगळे,संतोष नेटके,,विजय बगाडे,कविताताई कसबे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.