राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणेजिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे (Donje) गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर (Vitthal Polekar) यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
गुरुवारी पहाटे 6 वाजता मॉर्नींग वॉकसाठी गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या भागातील कुख्यात गुंड बाबू मामे (Babu Mame) याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे दिली होती. त्यानंतर आज विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तूकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
बाबू मामे याने काही दिवसांपुर्वी विठ्ठल पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार कार किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. त्यामुळं कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे दिली होती. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अशा घटनांमुळं पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ.