शिरूर-हवेली विधानसभेचे वातावरण फिरले हवेली मध्ये मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे अशोकबापु पवारांचे पारडे जड.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क 

विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येत आहे.तसतशी शिरुर- हवेली मतदार संघात रंगत वाढताना दिसतं आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार )महायुतीचे उमेदवार माऊलीआबा कटके यांनी हवेली तालुक्याचा भुमीपुत्र म्हणून प्रचारास केलेली सुरुवात .उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी ४० हजार नागरिकांना मोफत यात्रा.व तरुणांमध्ये असणारा थेट संपर्क यामुळे हवेली तालुक्यातील सर्वच गावांमध्ये वातावरण माऊलीमय झाले.सभांना व रॅलींना मिळणारा प्रतिसाद यामुळे माऊलीआबा अशोकबापुंना जड जाणार असे वातावरण पहिल्या टप्प्यात तयार झाले होते

परंतु शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे झालेल्या सभेनंतर वातावरण बदलण्यास सुरुवात झाली.त्यातच भर पडली मयुरी गृहप्रकल्पाची.सर्वसामान्यांनी आपली आयुष्याची पुंजी लावुन खरेदी केलेली घरे पुर्ण रकमा देऊन ही नावावर न झाल्यामुळे मयुरी गृहप्रकल्पाचे गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या.हा गृहप्रकल्प निर्मिती मध्ये माऊली कटके संचालक आहेत.शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचे थकबाकीदार म्हणून माऊली कटके यांचे नाव पुढे आले आहे.त्यांच्या जमनीवर जप्ती शेरे आले आहेत. त्यामुळे कटकेंच्या अडचणी वाढल्या.

fi

वाघोली गावचे माजी सरपंच शिवदास उबाळे, शिवसेनेचे संजयआप्पा सातव, महाराष्ट्र शासन नियुक्त नगरसेवक शांतारामबाप्पु कटके,माजी उपसरपंच कमलाकरदादा सातव, माजी उपसरपंच राजेंद्र सातव,दौलत पायगुडे,मिनाकाकी सातव , अर्चनाताई कटके,या आजी माजी पदाधिकारी यांनी शिस्तबद्ध पद्धतीने राबविलेल्या प्रचार यंत्रणेमुळे माऊली कटके होमपिचवर पिछाडीवर पडलेले दिसतात.

लोणी काळभोर येथे झालेली सुप्रियाताई सुळे यांची सभा . सकाळच्या वेळी देखील असलेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी यामुळे मोठ्या लोकसंख्या असलेल्या लोणी काळभोर,कदम वाकवस्ती गावांमधुन कार्यकर्त्यांनी केलेला शिस्तबद्ध प्रचार यामुळे अशोकबापु पवार यांच्या साठी जमेची बाजू आहे.

उरुळी कांचन गावांमध्ये खा. अमोल कोल्हे यांच्या सभेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.लोकसभेला अमोल कोल्हेंना तीन हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते .व उरुळी कांचन गाव हे शरद पवार साहेबांना मानणारे असल्याने उरुळी कांचन व परिसरातील मतदार हे अशोकबापु पवार यांचे बाजुने झुकलेले दिसतात.

थेऊर,कोलवडी,केसनंद,आव्हाळवाडी,या गावातील तरुण पिढी व ज्येष्ठांच्या समन्वयातुन व शिस्तबद्ध प्रचारामुळे आ. अशोकबापु पवार यांचे बाजु बळकट झाली आहे.

पहिल्या टप्प्यातील माऊली कटके यांनी प्रचारात घेतलेली आघाडी कमी करण्यात अशोकबापु पवारांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags