जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर यांचे वतीने गावफेरी द्वारे मतदार जागृती अभियान उपक्रम साजरा.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित न्यूज नेटवर्क

थेऊर प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २० नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहे.सर्व शासकीय यंत्रणा या निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या आहेत . सर्वच उमेदवारांनी देखील घरोघरी जाऊन स्वत:चा पक्ष ,चिन्ह पोहचविण्याचे प्रयत्न  केला आहे .निवडणुक शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे.

 

निवडणुक आयोग देखील जास्तीत जास्त संख्येने मतदान केले जावे.यासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात.याचाच एक भाग मतदार जनजागृती अभियान हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर मुख्याध्यापक सातपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी गावफेरी काढून मतदार जागृती अभियान उपक्रम साजरा केला.गावफेरी द्वारे मतदार जागृतीच्या घोषणा देण्यात आल्या.ढोल ,ताशे वाजवत संपुर्ण गावाला फेरी मारण्यात आली.विद्यार्थांच्या हातामध्ये मतदार जागृती चे फ्लेक्स बॅनर  होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर येथून सुरू झालेली गावफेरी भीमनगर, श्री चिंतामणी मंदिर, ग्रामपंचायत थेऊर मार्गक्रमण करत पुन्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये घेऊन जाण्यात आली.

उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले.

 


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags