राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानत ‘मुख्यमंत्री’ पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत थोड्या वेळेपूर्वीच जाहीर केले. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की मी काहीही ताणून ठेवलेलं नाही. मुख्यमंत्री पदासाठी अडून ठेवले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पदाबाबत घेतलेला निर्णय मला मान्य असेल. तसेच सत्तास्थापणेसाठी आमच्यामुळे कोणतीही अडचण होणार नाही असा विश्वास पंतप्रधानांना दिला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उद्या दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.
—————-