राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
अदित्य पंडित आणि सृष्टी तुली हे दोघे दोन वर्षं रिलेशन मध्ये होते. सृष्टी ही एअर इंडियामध्ये पायलट होती. शॉपिंगला जाण्यापासून ते आयुष्य कसं जगावं, कसं वागावं, काय खावं, काय प्यावं, या सगळ्याच गोष्टींसाठी आदित्य तिच्याशी भांडत असायचा. शॉपिंगला जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातच त्याच्या कारचा देखील अपघात झाला. त्यावेळी आदित्य तिला भररस्त्यात सोडून निघून गेला. आदित्यच्या या वागण्यामुळे सृष्टीला खूप वाईट वाटले. एकदा आदित्य सृष्टीला घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेला. त्यावेळी त्यांच्यात नॉनव्हेज खाण्यावरूनही भांडण झाले.
दोन वर्षं रिलेशनमध्ये राहूनही आदित्य सृष्टीला त्रासच देत होता. आदित्यने सृष्टीला १२ दिवस व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलं. वारंवार फोन करून अखेर १३ व्या दिवशी आदित्यचा फोन लागला. तेव्हा आपण आयुष्य संपवत असल्याचं सृष्टीने आदित्यला सांगितलं.
आदित्य घाबरून सृष्टीच्या फ्लॅटवर पोहोचला. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्याने चावीवाला बोलवून दरवाजा उघडला तर सृ्ष्टीचा मृतदेह डेटा केबलच्या साह्याने पंख्याला लटकलेला अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी सृष्टीच्या वडिलांनी पवई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रियकर आदित्य पंडित याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
—————