राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
एंजल हायस्कूल व जुनिअर कॉलेज चे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत दुहेरी पदक पटकावून ओडिसा येथील भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
मास्टर्स गेम असोसिएशन आयोजित मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक या ठिकाणी दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या . या स्पर्धेत राज्यातील हजारो खेळाडू उपस्थित होते. या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत बांबू उडी या प्रकारात १.४५ मीटर उडी मारून प्रथम क्रमांक पटकावला व उंच. उडी या प्रकारामध्ये १.१५ मीटर उडी तृतीय क्रमांक पटकाविला.
ओरिसा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी दिनांक ७ ते ९ मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एंजल हायस्कूल जुनियर कॉलेज येथे क्रीडा प्रमुख भाऊसाहेब महाडिक हे क्रीडा शिक्षक म्हणून २५ वर्ष कार्यरत असून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. त्यांनी घडविलेले अनेक खेळाडू जिल्हास्तरीय ,विभाग स्तरावरील व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करीत आहेत .
राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेचे नियोजन व आयोजन मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव बाळू चव्हाण , असोसिएशनचे सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू महेंद्र बाजारे, सहसचिव प्रभाकर दुबे , आंतरराष्ट्रीय खेळाडू विजेते धनंजय मदने, सहसचिव संतोष पवार,(पोलीस दल) , आयकर विभागाचे माजी .अधिकारी सुजित बडदे व आंतरराष्ट्रीय खेळाडू सय्यद अन्शर अली (पोलीस दल) यांनी केले.
पदक विजेते भाऊसाहेब महाडिक यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे ,सहाय्यक तालुका क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते,तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी ,तालुका क्रीडा प्रकाश मोहरे ,व ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री ,संचालक अविनाश शेलुकर ,संचालिका इराणी मॅडम , एंजल हायस्कूलचे प्राचार्या शमशाद कोतवाल ,एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या खुशबू सिंग, व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे