राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे : परभणी येथे १० डिसेंबर रोजी संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्याच्या तसेच याच आंदोलनात परभणी येथे न्यायालयीन कोठडित उच्चशिक्षित तरुण मृत्यु पावलेल्या घटनेचा सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या प्रकरणात असंख्य आंबेडकरी तरुंणांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले जात आहे. यामुळे तरुणांचे आयुष्य उध्वस्त केले जात आहे. या प्रकरणाच्या मुळाशी नक्की कोण आहे . कारण या प्रकरणाची व्याप्ती पाहता हे नियोजित षडयंत्र आहे तसेच संविधान शिल्प विटंबना झाल्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये काही निरपराध तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. व त्यांचे भविष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण सोमनाथ सूर्यवंशी नावाचा उच्चशिक्षित एल.एल.बी.करणारा तरुण केवळ व्हिडिओ चित्रीकरण करत होता म्हणून त्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला कारागृहात पाठवण्यात आले. व अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली या तरुणाचा कारागृहामध्ये संशयास्पद मृत्यू झालेला आहे . या प्रकरणांमध्ये पोलीस खात्याची भूमिका देखील संशयास्पद आहे कारण बहुतेक ठिकाणी दलित वस्त्यांमधील गाड्या फोडण्याचा काम पोलीस कर्मचारी करताना दिसत आहेत .त्याचं व्हिडिओ चित्रीकरण देखील सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे.असे निवेदनात म्हटलं आहे.व खालील प्रमाणे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
१)सविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे या विटंबना प्रकरणाच्या मागे नक्की कोणती शक्ती आहे याचाही शोध घेण्यात यावा कारण वरवर दिसत असले तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे.
२) व्हिडिओ चित्रीकरणांमध्ये दिसत असलेले पोलीस कर्मचारी हे दलित वस्ती मधील गाड्या फोडताना दिसत आहेत त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांना असे आदेश देणारे अधिकारी यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी
३) सविधान शिल्प विटंबना झाल्यानंतर उसळलेल्या दंगली मधील निरपराध तरुणांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व त्यांची कारागृहातून तात्काळ मुक्तता करण्यात यावी.
४) न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांचे पोस्टमार्टम अहवाल मध्ये गंभीर मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. असे नमुद करण्यात आले आहे त्यामुळे या प्रकरणातील पोलीस अधिकारी यांचे वरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी दिनांक १७/१२/२०२४ रोजी लोणी काळभोर रेल्वे स्टेशन चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
निवेदनावर पार्टी तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष मारुतीदादा कांबळे, बहुजन दलित महासंघाचे अध्यक्ष आनंद वैराट, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष कुमार नितनवरे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कांबळे, रमेश गायकवाड ,राजेंद्र कांबळे, अविनाश कांबळे, सोमनाथ खंडागळे, पप्पू चौधरी, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे, दीपक आढाळे, राकेश लोंढे, दिगंबर जोगदंड, कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय राजेंद्र करणकोट यांनी स्वीकारले. याबाबतची प्रत
१)ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब.
मुख्यमंत्री महाराष्ट्र
२) ना .एकनाथजी शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
३)ना.अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
४) मा.रश्मी शुक्ला मॅडम
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य.
यांना स्पीड पोस्ट द्वारे पाठवण्यात आलेले आहे.