राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर प्रतिनिधी.
परभणी येथे संविधान शिल्प विटंबना झाल्यानंतर राज्यभर निषेध आंदोलने असताना सोमनाथ सूर्यवंशी या एल.एल.बी.करणारा युवाभीमसैनिकाचा पोलीस कस्टडी मध्ये संशयास्पद मृत्यू झालेला आहे .या घटनेचा निषेध करण्यासाठी पुर्व हवेली सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने लोणी काळभोर रेल्वे स्टेशन चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी शेकडो भीमसैनिक व संविधान समर्थक नागरीक उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्र सरकार व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला.या प्रकरणातील आरोपी अटक जरी असले तरीदेखील या प्रकरणा मास्टर माईंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई ची मागणी या प्रसंगी करण्यात आली.शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मारुतीदादा कांबळे, बहुजन दलित महासंघ अध्यक्ष आनंद वैराट, लोणी काळभोर ग्रामपंचायत गणेश कांबळे, रिपब्लिकन युवा नेते दिपक आढाळे, मातंग एकता आंदोलन सरचिटणीस दिगंबर जोगदंड, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे राकेशभाऊ लोंढे, वंचित बहूजन आघाडी संजय भालेराव, नितीन जगताप ,केतन निकाळजे ,बाळासाहेब दाभाडे ,अमोल टेकाळे, विशाल शेलार अभिजीत पाचकुडवे व असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते .