राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
भिम क्रांती मित्र मंडळ व सर्व बहुजन समाज यांच्या वतीने परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू व लोकसभा मध्ये अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याबाबत केडगाव मध्ये निषेध करण्यात आला
केडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले तसेच केडगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले अमित शहा यांचा फोटो जाळत त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भीमसैनिकांनी अमित शहा मुर्दाबाद घोषणा भीमसैनिकांनी यावेळी दिल्या यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे दौंड तालुका महासचिव प्रथमेश गायकवाड बोलताना म्हणाले की अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा नाहीतर अमित शहा यांनी माफी मागावी प्रथमेश गायकवाड परभणी बाबत असेही म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू बाबत पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सगळ्या गोष्टी पुढे आलेले आहेत तरी त्याबाबत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जे जबाबदार पोलीस अधिकारी किंवा तिथले जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई सरकारनी करावी व पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन करण्याचे आदेश कोणी दिले ही ते भाषण करताना बोलत होते व सागर खांडेकर यांनी बोलताना म्हणाले की परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली यावेळी भीम क्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, व सर्व बहुजन समाज भीम अनुयायी उपस्थित होते .