अज्ञात माथेफिरू ने फाडलेला बॅनर.
ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आलेला बॅनर.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
कुंजीरवाडी ग्रामपंचायतचा ४४ वा वर्धापन दिनानिमित्त सरपंच हरेशभाऊ गोठे यांच्या संकल्पनेतून वर्धापन दिनाचे औचित्य साधून कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते व या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते .परंतु अज्ञात माथेफिरू कडून हा बॅनर फाडण्याचा प्रकार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती कुंजीरवाडी ग्रामपंचायत सरपंच हरेशभाऊ गोठे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले
थेऊर फाट्यावर बॅनर लावले होते.बॅनर लावण्यामागे एकच उद्देश होता की नागरिकांना माहिती होईल व शिबिराचा लाभ घेता येईल तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी पंचवीस ते पन्नास हजार रुपये वाचतील. अज्ञात माथेफिरू व्यक्तीने हा बॅनर फाडला. दोन महिन्यांच्या पूर्वी गाढवे मळा येथे विकास कामांचा बॅनर लावला होता तो बॅनर पण फाडण्यात आला होता. बॅनर फाडले म्हणजे गावचा विकास थांबणार नाही आम्ही अजून मोठ्या प्रमाणात गाढवे मळा, धुमाळ मळा व गावात विकास कामे करणारच असे ही ते म्हणाले व पुढील विकासकामाबाबत माहिती दिली.
गाढवे मळा वार्ड 3
25 लाख नागरी सुविधा अंतर्गत
17 लाख जनसुविधा अंतर्गत
5 लाख स्थानिक विकास अंतर्गत
25 लाख 3054/स्थानिक विकास निधी अंतर्गत (काम होणे बाकी)
15 लाख 15वित्त आयोग ड्रेनेज
एकूण – 87 लाख रुपये
धुमाळ मळा वार्ड 2
40 लाख 3054 निधीतून
15 लाख जनसुविधा
8 लाख 15वित्त आयोग
5 लाख नागरीसुविधा
40 लाख नागरी सुविधा (काम होणे बाकी)
11 लाख 15 वित्त आयोग ड्रेनेज
एकूण – 1 कोटी 19 लाख रुपये