राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडुन मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाची अंमलबजमहापालिकेची बांधकाम विकास योजना, बांधकाम विभाग व विविध सेवांबाबत लागणार्या कागदपत्रकांची माहिती नागरिकांना सहजगत्या मिळावी यासाठी बांधकाम विभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कक्षामध्ये किऑक्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांच्या हस्ते या सुविधेचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, मिळकत कर विभागाचे प्रमुख माधव जगताप, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर आदी अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणीचाच हा एक भाग असून त्याची सुरूवात शहर अभियंता विभागापासून सुरू करण्यात आली आहे. बांधकाम विभागात येणार्या नागरिकांसाठी याठिकाणी प्रतिक्षालय सुरू करण्यात आले आहे. या किऑक्सच्या माध्यमातून वैयक्तिक भोगवटा पत्र देणे, विकास आराखडा झोनिंग, विकास आराखड्याचा भाग नकाशा, गुंठेवारी, अन्य बांधकाम मान्यता, ले आउट मान्यता यासाठी लागणार्या कागदपत्रांची माहिती नागरिकांना सहजगत्या मिळणार आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.