बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा खुलासा; दोन नावं समोर आल्याने खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp

 राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. त्यांच्या मुलाने, झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique), मुंबई पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काही महत्त्वाच्या नावांचा उल्लेख केला असून, त्यात बिल्डर आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे. झिशानच्या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) आणि भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची नावं आहेत. मात्र, बिश्नोई गँगचा उल्लेख न केल्याने प्रकरण अधिक गहन झालं आहे.

 

झिशानने पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, त्यांच्या वडिलांच्या डायरीत काही बिल्डर आणि विकासकांची नावं आहेत. तसेच, हत्या होण्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांनी संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यान व्हॉट्सअॅपवरून मोहित कंबोज यांच्याशी संवाद साधला होता.

  SRA प्रकल्प आणि राजकीय संबंधांची शक्यता

झिशान सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये एसआरए प्रकल्पाचा (SRA Project) उल्लेख केला असून, त्यांनी काही बिल्डर आणि विकासकांची नावं पोलिसांसमोर मांडली आहेत. त्यांच्या मते, अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. डायरीत नमूद झालेल्या माहितीचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

याशिवाय, झिशान यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या वडिलांची हत्या होण्याआधी मोहित कंबोज यांच्यासोबत एका बिल्डरच्या कामासाठी संवाद झाला होता. मात्र, या संवादाचा हत्येशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags