महिलेचा विनयभंग करणार्‍या रिक्षाचालकास अटक; महिलेचा हात धरुन केले लज्जास्पद वर्तन, हडपसरमधील घटना

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : हडपसर येथून घरी जात असताना सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने महिलेचा हात धरुन तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केले होते. या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर वैजनाथ परळीकर (वय २१, रा. श्रमिक वस्ती, कर्वेनगर) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना २४ जानेवारी रोजी घडली होती.फिर्यादी या हडपसर येथून रिक्षाने त्यांच्या घरी मांजरी येथे जात होत्या. सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने फिर्यादी यांचा हात धरुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले़ घटनास्थळ भागातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षा निष्पन्न केली. तांत्रिक तपासाद्वारे शिवशंकर परळीकर याला अटक केली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags