धक्कादायक ! रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून 14 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Facebook
Twitter
WhatsApp

सोलापूर : माढा तालुक्यातील आढेगाव येथे सातवीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय मुलाने अज्ञात कारणाने रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवार (दि.२७) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. श्रीधर हा सराटी (ता. इंदापूर) येथील जिजामाता प्रशालेमध्ये सातवीत शिक्षण घेत होता. घटनेच्या दिवशी तो आजारी असल्याने घरीच होता. त्यास दवाखान्यात तपासणी करून आणले होते. डॉक्टरने त्यास विश्रांतीचा सल्ला दिला होता. दरम्यान त्याने अज्ञात कारणाने सोमवारी दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत जीवन संपवले. गोळीबाराचा आवाज एकून घरातील आई, आजोबा व इतर धावत आले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

श्रीधरने जीवन का संपवले याचे कारण समजू शकले नाही. श्रीधर याचे वडील राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. तो आई, लहान भाऊ, आजी, आजोबा यांच्यासमवेत राहत होता. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags