राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गंभीर हुंडाबळी गुन्ह्यात आरोपी संतोष विठ्ठल पवार, विठ्ठल तुकाराम पवार, व सौ. मंगल विठ्ठल पवार यांना मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी सात वर्षे सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधाकारावास अशी शिक्षा सुनावली आहे. हि घटना १५ नंबर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे येथे दिनांक ३०/११/२०१२ ते २५/०५/२०१३ रोजीच्या दरम्यान घडली. आरोपींनी लग्नात राहिलेली भांडी, सोने व अन्य वस्तू दिले नसल्याने मानसिक व शारिरीक छळ करुन मारहाण केली, ज्यामुळे मयत सविता संतोष पवार यांनी रॉकेल ओतून पेटवून घेऊन मयत झाल्या.
हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक २१५ / २०१३ भा.दं.वि. कलम ४९८ (अ), ३०४(ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. व पोलीस उप निरीक्षक श्री. बी. एम. पवार यांनी तपास केला. सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. प्रदिप गेहलोत, कोर्ट पैरवी स.पो.फौ. श्रीशैल तेलुनगी, व पोलीस अंमलदार अविनाश गोसावी यांनी कामकाज पाहिले.
मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपींना सात वर्षे सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. या निर्णयानंतर मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी सपोफौ श्रीशैल तेलुनगी व पोलीस अंमलदार अविनाश गोसावी यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.