लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे शहरात दोन महिला संगणक ऑपरेटर्सना रंगेहाथ पकडले .

Facebook
Twitter
WhatsApp

 

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

 

पुणे शहर प्रतिनिधी.

पुणे शहरात सेतू कार्यालय, अप्पर तहसिल कार्यालय हवेली येथे लाच मागणी व लाच स्वीकारल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात दोन महिला संगणक ऑपरेटर्स आरोपी आहेत.

पुणे शहरात ३१ जानेवारी २०२५ रोजी ही घटना घडली. आरोपी लोकसेवक श्रीमती वंदना दिनेश शिंदे व श्रीमती जयश्री रोहिदास पवार या दोन्ही संगणक ऑपरेटर्स आहेत.

तक्रारदाराने भुमिहीन असल्याबाबतचा दाखला मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता, त्यासाठी श्रीमती वंदना शिंदेने ५०० रुपयांची लाच मागणी केली होती. श्रीमती वंदना शिंदेने शासकीय फी व्यतिरिक्त ४०० रुपये लाच रक्कम मागणी करून स्वीकारली, या कृत्यात श्रीमती जयश्री पवारने प्रोत्साहन दिले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी करून आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडले. बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

पोलीस उप आयुक्त श्री. शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारच्या लाच मागणीच्या प्रकरणात तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags