महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी केले स्पष्ट
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
सासवड :पुरंदर तालुका आरपीआय आठवले गटाच्या तालुका अध्यक्षपदी पंकज धिवार हेच असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. पंकज धिवार यांच्या निवडीचा कार्यकाल संपला नसल्याने त्यांचं त्यांच्या पदावरून करण्यात आलेल निलंबन रद्द करून पंकज धिवार हेच पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून काम करतील असं स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत एक पत्र पुणे जिल्हा अध्यक्ष
कदम यांना देण्यात आले आहे. यामध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.
या दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार हे पक्षाच्या निवडणुक धोरण आणि निवडणुक कार्यक्रमानुसार अध्यक्ष पदावर विराजमान झाल्याने पक्षाचे ते अधिकृत अध्यक्ष असतांना जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम यांनी कोणतेही ठोस कारण नसतांना निलंबित करण्याचे पत्र दिले होते. त्यावर जिल्हा कार्यकारणी, तालुका अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड या सर्वांच्या लक्षात ही बाब आणून दिल्या नंतर, प्रदेश अध्यक्षांनी पंकज धिवार हेच पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून कायम राहतील असा स्पष्ट सुचना वजा आदेश दिला आहे.
जिल्हा अध्यक्षपदी निवड करतांना कोणत्याही तालुक्याचे अध्यक्ष बदलणार नाही असे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम यांनी मान्य केले होते.असे असतांना सुद्धा कदम यांनी आदेशाचे पालन केलेले नाही. पक्षांतर्गत बाबी वर पक्षाच्या बैठकीत चर्चा व्हायला पाहिजे होती. पक्षांतर्गत बाबी पोलिस स्टेशनला पत्र देऊन पोहचवन्यात आल्या. हि अशोभिनय कृती आहे. पंकज धिवार यांना निलंबित करून व तोतया ठरवून पक्षातून हकालपट्टी केली ती कोणाच्या आदेशा वरून हे आपण सिद्ध केले पाहीजे असे देखील पत्रात म्हंटले आहे.
तर कदम यांनी बळीराम सोनवणे यांची पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून केलेली निवड चुकीची असून ती त्वरित रद्द करावी असेही पत्रात म्हटले आहे. बळीराम सोनवणे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय तथा अधिकारीता राज्य मंत्री भारत सरकार रामदास आठवले साहेबांच्या आदेशाचे उल्लंघन करून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे काम न करता विरोधी उमेदवाराचे काम केलेले आहे. तसेच ज्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयाचे उदघाटन केले त्या विष्णु भोसले यांनी पण कॉग्रेस उमेदवाराचा प्रचार करून कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या वर कारवाई न करता आकस व सूड बुद्धीने पंकज धिवार यांच्यावर केलेली कारवाई अन्याय कारक आहे असे देखील पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे जिल्हाध्यक्ष कदम यांनी घेतलेला निर्णय पक्ष हिताचा नाही. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचेशी झालेल्या चर्चे नंतर बळीराम सोनवणे यांच्या निवडीला स्थगिती आदेश देण्यात येत आहे असे पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे अध्यक्ष पंकज धिवार हेच असतील ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील असं या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.