मेट्रिमोनी साईटवरुन महिलाशी मैत्री करुन, फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार इंदोर मध्यप्रदेश येथुन काळेपडळ पोलीसांकडुन अटक

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे. मेट्रिमोनी साईटवरून महिलाशी मैत्री करून फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार, अमन प्रेमलाल वर्मा (वय 38 वर्ष), इंदोर, मध्यप्रदेश येथून पोलीसांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली आहे.
आरोपीने मेट्रिमोनी साईटवर फेक आयडी तयार करून एका महिलाशी मैत्री केली. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि ऑनलाइन व रोख स्वरूपात सुमारे ४५ लाख रुपये उकळले. या फसवणुकीच्या प्रकारामुळे महिलेला मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारचे नुकसान झाले आहे.
काळेपडळ पोलीस ठाण्याचे तपास पथक गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीला इंदोर येथून शिताफीने ताब्यात घेतले आणि पुणे शहरात आणून गुन्ह्याचे तपासकामी अटक केली. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३७६, ३७६(२)(एन), ४२० मधील गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला १० फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.
तपासात असे निष्पन्न झाले आहे की आरोपी दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदोर या ठिकाणीही गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे. मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त श्री. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार, पोलीस हवालदार युवराज दुधाळ, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले यांचे पथकाने कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags