शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या मोटारसायकल चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून ६,६०,०००/ रू. किंमतीच्या मोटारसायकली जप्त

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या मोटारसायकल चोरीचे 11 गुन्हे शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात आरोपी संतोष उर्फ शरद गजानन इंगोले रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि. वाशिम, याची दि. ०७/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.

शिरूर पोलीस स्टेशनमधील वेगवेगळी पथके वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोटारसायकल चोरी उघडकीस आणण्यासाठी कार्यरत होती. पोलीस अंमलदार विजय शिंदे व नितेश थोरात यांना मिळालेल्या गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीतास ताब्यात घेवुन चौकशी करून ९ हिरो कंपनीच्या स्पलेंडर प्लस मोटर सायकल, १ हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटर सायकल, १ होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. या मोटारसायकलींची एकूण किंमत ६,६०,००० रुपये आहे.

 

जप्त केलेल्या मोटारसायकली व ठिकाणे

चोरी केलेल्या मोटारसायकली धाड पोलीस स्टेशन, भोसरी एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेशन, आळंदी पोलीस स्टेशन, महाळुंगे पोलीस स्टेशन, दिघी पोलीस स्टेशन येथून जप्त करण्यात आलेल्या आहेत.

आरोपी संतोष उर्फ शरद गजानन इंगोले यास शिरूर पो.स्टे गु.र.नं ३९ / २०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन त्यास दि. ०७/०२/२०२५ रोजी मा.न्यायालयात रिमांडकामी केले असता मा. न्यायालयाने त्यास दि.०९/०२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी आदेशित केली आहे.

आरोपीविरोधात जळुका पो.स्टे, मालेगाव पो.स्टे, पातुर पो.स्टे, जामनेर पो.स्टे, लोणार पो.स्टे, मेहकर पो.स्टे येथे दुचाकी चोरीसंदर्भातील एकुण सात गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.

 

मा.पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक सोो पुणे विभाग श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोो, शिरूर उपविभाग श्री. प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री अविनाश शिळीमकर, शिरूर पो.स्टे चे प्रभारी अधिकारी पो.नि.श्री. संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पो.स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags