राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पाषाण गावात ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६:०० ते ६:३० वाजेच्या दरम्यान मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीचा धारदार हत्याराने खून करण्यात आला.मयत महेश तुपे दुध आणण्यासाठी गेले असताना, कोकाटे आळी गणपती मंदीराजवळ आरोपी ओम बाळासाहेब निम्हण व दोन साथीदारांनी संगणमताने धारदार हत्याराने जखमी करून त्याचा खून केला पसार झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे व गुन्हे शाखा, युनिट ४ चे पथक घटनास्थळाची पाहाणी करून माहिती घेतली. पोलीस हवालदार अजय गायकवाड व हरिष मोरे यांचे बातमीदारा मार्फत आरोपीची माहिती मिळाल्यानंतर, आरोपी ओम बाळासाहेब निम्हणला फक्त ४ तासात ताब्यात घेण्यात आले.
चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.८०/२०२५ भा.न्या.सं.कलम १०३,३(५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ओम बाळासाहेब निम्हणला पुढील कारवाईसाठी चतु:श्रृंगी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.