महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मा.आबासाहेब काळे यांची निवड.

Facebook
Twitter
WhatsApp

हो

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

  गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात तसेच पैलवान म्हणून दत्तात्रय उर्फ आबा पांडुरंग काळे हे प्रसिध्द आहेत. त्यांच्या या कार्याचा लाभ महाराष्ट्रातील पैलवानांना व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या ‘प्रदेश उपाध्यक्ष (निमंत्रित)’ या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील पैलवानांना न्याय देण्याकरिता तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे संघटन वाढवण्याकरिता प्रयत्न करावे, असे या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या नियुक्तीवर बोलताना दत्तात्रय उर्फ आबा काळे म्हणाले, राज्यात कुस्तीचा नावलौकिक वाढवण्याबरोबरच या क्षेत्रामध्ये अनेक मल्ल तयार करणे, तसेच पैलवानांना न्याय मिळेल या भूमिकेतून प्रयत्न करणार असल्याचे दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी म्हंटले आहे. त्याचबरोबर ही निवड सार्थ ठरवण्यासाठी आगामी काळात उल्लेखनीय जबाबदारी पार पाडू,असेही त्यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags