सासवड : बुलेटच्या फायरिंगमध्ये कृत्रिम बदल करून कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारींवरून १३ बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला असून, मोठ्या रोलरखाली सर्व ‘बुलेट’चे सायलेन्सर नष्ट केल्याची कारवाई पोलिस निरीक्षक हृषीकेश अधिकारी आणि भोर उपविभागीय पोलिस अधीक्षक तानाजी बर्डे यांच्या पथकाने केली आहे.
