पुणे : बेकायदा गॅस रिफिलिंग करत असताना गॅस गळती होऊन त्यात २२ गॅस सिलेंडरचा स्फोट कात्रज परिसरातील अंजलीनगर येथे झाला होता. या घटनेपासून बोध न घेताच मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगरमधील गल्ली नं. ४ येथे एका छोट्या खोलीत बेकायदेशीरपणे मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता. आंबेडकरनगर झोपडपट्टीत अतिशय दाट लोकवस्तीमध्ये एका छोट्याश्या खोलीमध्ये हे बेकायदा कृत्य सुरु होते. तेथे काही दुर्घटना घडली असती तर अग्निशमन दलाच्या गाडीला आत जाण्यासही जागा नाही. तेथे जाण्यासाठी अतिशय निमुळता रोड आहे.
