स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपीने सांगितले जीव देण्याचा कसा केला प्रयत्न

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे – पोलीस आपल्या मागावर लागल्याचे समजल्यावर नराधम दत्तात्रय गाडेने शेतातील एका झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण झाडाच्या फांदीला बांधलेली दोरी त्याच्या वजनाने तुटून तो खाली पडला आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला.दत्तात्रय गाडे याला पकडल्यानंतर त्याने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले.गुन्हे शाखेने मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गाडे या नराधमाला गुनाट गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुण्यात आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात डॉक्टरांना त्याच्या गळ्याभोवती व्रण आढळून आले. त्याच्या वैद्यकीय अहवालात त्याची नोंद आहे. याबाबत विचारल्यावर त्याने पोलीस आपल्या मागावर असल्याचे पाहून एका शेतात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण गळ्याला फास लावून घेतल्यानंतर झाडाच्या फांदीला बांधलेली दोरी तुटल्याने आपला आत्महत्येचा प्रयत्न फसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर कीटकनाशक मिळविण्याचा व ते पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार होतो, परंतु, कीटकनाशकाचा शोध घेऊनही ते मिळू शकले नाही.याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गाडे याच्या गळ्यावर व्रण असल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा त्यांना आढळून आले आहे. आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे तो सांगतो. तपास आता प्राथमिक स्तरावर आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न कोठे केला, याची तेथे जाऊन पाहणी केल्यानंतरच त्याबाबत नक्की ठरविता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags