एकाच दिवशी 5 गुंडांना केले तडीपार; हडपसरमधील 2 तर कोंढवा, मुंढवा, बिबवेवाडीतील एक गुंड

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे – परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एकाच दिवशी ५ सराईत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.आणखी १०० हून अधिक गुंड रडारवर असल्याचे सांगण्यात आले. किशोर अमर सोळंकी (वय २१, रा. बिराजदारनगर, वैदुवाडी, हडपसर) याच्यावर जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकादेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.अक्षय अनिल पवार (वय २७, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) याच्यावर दुखापत, जबरी चोरी यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत.कादीर ऊर्फ काजु आरीफ अन्सारी (वय २१, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकादेशीर शस्त्र बाळगणे यासारखे ७ गुन्हे दाखल आहेत.साहील रफीक कलादगी (वय २१, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) याच्या विरुद्ध खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, मारहाण, धमकावणे, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत.करण हरीदास जाधव (वय २४, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा तयारी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.हे पाचही तडीपार गुंड हे २१ ते २५ वयोगटातील सराईत गुन्हेगार आहेत. २०२५ मध्ये यापूर्वी ६ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिमंडळ ५ मधील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आमचे रडारवरील आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपारीची कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.हे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार पुढील २ वर्षांच्या काळात पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags