स्वारगेट बलात्कार प्रकरण : मला खाली जाऊ दे! तरुणीची विनवणी, नराधमाने गळाच दाबला

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे – स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पुणेपोलिसांनी अटक केली. दत्तात्रय गाडे, असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून त्याला या घृणास्पद घटनेनंतरही पाठिंबा मिळत आहे.दरम्यान, मंगळवारी (दि. २५) घडलेल्या अत्याचारावेळी आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी पीडितेने त्याला गयावया केल्याची माहिती समोर आली आहे.पीडितेला बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे बोलून दत्तात्रय घेऊन गेला. पीडिता बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजादेखील बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाहीये, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले. पीडितेने मदतीसाठी आवाज दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला. पीडिता शिक्षित असल्याने तिला यापूर्वी देशात अशाप्रकारच्या घटनांमध्ये आरोपींनी अत्याचार केल्यानंतर त्यांचा खून केल्याचे माहीत होते. त्यामुळे पीडितेने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना नराधमाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीडिता घाबरली आहे, ती प्रतिकार करत नसल्याचे लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा पीडितेवर अत्याचार केला.
आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी पीडितेला धीर देत स्वारगेट पोलिस ठाण्यात जात आरोपीविरोधात तक्रार देण्याचे सांगितल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags