अप्पर तहसील कार्यालय कार्यभार लोणी काळभोर येथूनच सुरु होणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी* 

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

हवेली, पुणे : हवेली तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पूर्व हवेली साठी स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर येथे गेल्या काही वर्षांपूर्वी मा. आमदार अशोक पवार यांच्या मागणी नुसार राज्य शासनाकडून नव्याने कार्यालय मंजुरी देण्यात आली होती, परंतू जागे अभावी हे कार्यालय काही दिवस रखडले असल्याचे दिसत होते.

 

गेल्या काही दिवसांपासून शिरूर हवेलीचे मा. आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर चे सामाजिक कार्यकर्ते, लोणी काळभोर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे मा. चेअरमन व विद्यमान संचालक संजय भालेराव, शिवसेना हवेली तालुका उपप्रमुख पत्रकार हनुमंत सुरवसे, पत्रकार महेश फलटणकर,पत्रकार विकास काळभोर व इतरत्र सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन पूर्व हवेलीतील एकूण २० ग्रामपंचायतींचे निवेदन,सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले होते.

 

या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून दि. ७ मार्च २०२५ रोजी संजय भालेराव व हनुमंत सुरवसे यांनी आज पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सविस्तर भेट घेऊन लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण होई पर्यंत नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अप्पर तहसील कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात भाडे तत्वावर लोणी काळभोर येथे सुरु करावे या साठी निवेदन दिले, तसेच कार्यालय इमारत बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करावे या मागणी साठी चर्चा केली.

 

पुढील महिन्याभरात अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर हे लोणी काळभोर येथूनच सुरु होईल असे आश्वासन आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बोलताना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags