महिलांचे केले व्हिडिओ रेकॉर्ड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी, खंडणी उकळणार्‍या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे – धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी गोळा करणार्‍या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. तु टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन अशी रोहित वाघमारे याने धमकी दिली होती. रोहित गुरुदत्त वाघमारे (वय २९, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी, सध्या रा. पंचशिल तरुण मंडळ, भिमनगर, उत्तमनगर), शुभम चांगदेव धनवटे (वय २०, रा. गणराज कॉम्प्लेक्स, उत्तमनगर), राहुल ज्ञानेश्वर वाघमारे (वय ३५, रा. एसआरए बिल्डिंग, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता.यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता. मसाज करताना तिळाचे तेल वापरण्यास सांगितले. मसाज करत असताना रोहित वाघमारे याने या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार दिल्यावर त्याने मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. तु जर मी सांगेल तसेच उपचार केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन, असे सांगून जबरदस्तीने टॉप काढायला लावून उपचार करुन घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने २ ते ३ जण तो घेऊन आला. त्याने फिर्यादी महिलेला त्याने मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून २० हजार रुपये दे, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर काऊंटरमध्ये असलेले ८०० रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले. त्यानंतर भितीमुळे त्यांनी ही बाब कोणाला सांगितली नाही. महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार अर्ज केला होता.या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण करुन संशयित आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेऊन पोलिसांनी तिघांना अटक केली.अशा प्रकारे मसाज पार्लरमध्ये जाऊन नकळत व्हिडिओ काढून खंडणी उकळण्याचा यांचा धंदा असल्याचे आढळून आले. त्यांनी शहरातील वेगवेगळ्या ७ ते ८ ठिकाणी असा प्रकार केल्याची कबुली दिली आहे.रोहित वाघमारे याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तसेच रोहित व शुभम धनवटे यांच्याविरुद्ध बीडमधील अंभोरा पोलीस ठाण्यात तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हे दाखल आहेत. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, निखिल राजीवडे, प्रदिप रेणुसे, आकाश किर्तीकर, महेश भगत, अमित पदमाळे, योगेश ढोले, खंडु शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags