पुणे – पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पुण्यातील गुन्हेगारांना कायद्याचं कोणतही भय उतरलं नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता पुण्यात अनैतिक संबंधातून पतीची पत्नीकडून आणि प्रियकराकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हत्यानंतर पतीचा मृतदेह पोत्यात घालून 55 किलोमीटर दूर नेला अन् विल्लेवाट लावल्याचं देखील समोर आलंय. हडपसर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिचा प्रियकर दररोज तिला लपूनछपून भेटायला येत असायचा. पण नवऱ्याचा याची काहीही खरब लागायची नाही. एक दिवस रात्री नवरा बायको झोपलेले असताना प्रियकर अचानक भेटण्यासाठी घरी आला. बायकोने प्रियकराला निघून जाण्यास सांगितलं. पण तेवढ्याच नवऱ्याला कून कून लागली. नवऱ्याने उठून पाहिल्यावर त्याला पत्नी आणि तिचा प्रियकर दिसला. यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली. याच भांडणात पत्नीने आणि प्रियकराने नवऱ्याची हत्या केली. भांडणात नवऱ्याचा मृत्यू झाल्याचं पत्नीच्या लक्षात आलं अन् डोक्याला हात लावला. बायको आणि तिच्या प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. रात्री दीड वाजता स्कुटरवरून मृतदेह हडपसरपासून सारोळ्याला नेला. 55 किलोमीटर दूर असलेल्या नदीत मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण पोलिसांना या हत्येचा सुगावा लागला अन् आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.दरम्यान, सिद्धेश्वर बंडू भिसे असे मृत पतीचे नाव आहे. तर आरोपी योगिता सिद्धेश्वर भिसे आणि शिवाजी सुतार यांना राजगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
