पुणे – मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांकरीता ७ कलमी कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठेवून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या परिसरात पकडण्यात आलेला ६८३ किलो ६३० ग्रॅम गांजा रांजणगाव एमआयडीसीमधील महाराष्ट्र एनव्हीरो पॉवर लि़ या कंपनीच्या भट्टीमध्ये नष्ट करण्यात आला.पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ५२ गुन्ह्यांमध्ये तब्बल ६८३ किलो गांजा जप्त केला होता. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आणि पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत एनडीपीएस गुन्ह्यामधील जप्त अंमली पदार्थांची पाहणी केली. या समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत हा गांजा जाळण्यात आला.ही कार्यवाही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशाी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, विवेक पाटील, स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांबळे, पोलीस हवालदार किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, पोलीस अंमलदार संतोष स्वामी, सदानंद रुद्राक्षे, रणधीर माने, कपिलेश इगवे यांनी केली आहे.
