रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा . छत्रपती संभाजी राजे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क.

प्रतिनिधी रायगड : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी मागणी करणारे पत्र संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे.

समाधीबाबत ऐतिहासिक संदर्भ, पुरावे नाही त्यामुळे 31 मे पर्यंत समाधी हटवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे . तसेच या पत्रामध्ये कुत्र्याच्या समाधीचा कपोलकल्पित असल्याचा उल्लेख करत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. असे संभाजीराजे म्हणाले.

 

कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं त्यांनी पत्रात म्हंटलंय.

 

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

 

 

हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथीत वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाहीभारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.

 

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags