दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  वाढदिवसानिमित्त  विविध उपक्रमांचे आयोजन

Facebook
Twitter
WhatsApp

,राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

समाजसेवक दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी मु .पो.थेऊर,ता.हवेली,जि.पुणे जेतवन बुध्द विहार भिमनगर येथे विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. त्यांच्या मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने ही मानवंदना अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

यानंतर रक्तदान शिबिर भरविण्यात आले, ज्यात तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, ज्यांना मोतीबिंदूची गरज होती त्यांच्यासाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात विशेष प्रवचन ह.भ.प . दत्तात्रय सोळसकर यांचे ठेवण्यात आले होते.ज्यामध्ये दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.मैत्री, समाजसेवा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप अन्नदान उपक्रमाने करण्यात आला, ज्यात सर्व ग्रामस्थ व उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

 

उदय दादा कांबळे यांच्या मित्रपरिवाराने सांगितले, “दिवंगत उदय दादा हे नेहमी समाजहिताचा विचार करीत असत. त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे.”

 

या उपक्रमास गावकऱ्यांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या कार्यास अभिवादन केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags